पुणे – येरमाळा येथील येडेश्वरी देवीच्या यात्रेहून परतताना पुणे सोलापूर महामार्गावर झालेल्या अपघातात पुण्यातील भवानी पेठ परिसरातील ११ यात्रेकरू गंभीर जखमी झाले. भिगवण, इंदापूर, बारामती येथे कार्यरत असलेल्या १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींवर तातडीचे उपचार सुरू करण्यात आले, तसेच त्यांना जवळच्या रुग्णालयांमध्ये पोहोचवण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुणे सोलापूर महामार्गावर शनिवारी पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला. खासगी प्रवासी बसला टेम्पोने धडक दिल्याने हा अपघात झाला. बसमध्ये भवानी पेठ परिसरातील ३१ प्रवासी होते. त्यांपैकी २२ जणांना नजिकच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. नऊजणांवर रुग्णवाहिकेत उपचार करण्यात आले.

हेही वाचा – छत्तीसगड सीमेवरील टकेझरी जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक

हेही वाचा – ‘सरल अ‍ॅप’चा ताप व उमेदवारीचा धाक, भाजपा नेते कोंडीत

१०८ रुग्णवाहिका सेवेचे पुणे जिल्हा समन्वयक डॉ. प्रियांक जावळे म्हणाले, बारामती, दौंड, मोरगाव, यवत, कुरकुंभ आणि भिगवण येथील सहा १०८ रुग्णवाहिका तातडीने अपघातस्थळी रवाना करण्यात आल्या. जखमी रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. ११ प्रवासी गंभीर जखमी आहेत, असेही डॉ. जावळे यांनी सांगितले.