पुण्यात पुणे-बंगलोर महामार्गावरील नवले पुलाजवळ स्वामी नारायण मंदिर येथे आज मध्यरात्री ट्रक आणि ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या घटनेमध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला असून २२ जण जखमी झाले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-बंगलोर महामार्गावरून मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरवरून मुंबईच्या दिशेने २५ प्रवाशांना घेऊन एक ट्रॅव्हल बस जात होती. त्याच दरम्यान साखरेची वाहतूक करणार्या ट्रकने पाठीमागून ट्रॅव्हल बसला जोरात धडक दिली. या धडकेत बस आणि ट्रक पलटी झाली. या घटनेमध्ये २२ जण जखमी झाले आहेत, तर तिघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेतील जखमींना जवळील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
प्रवाशांना वाचविण्यासाठी जवळपास २ तास बचाव कार्य
वाहनात अडकलेल्या प्रवाशांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप बाहेर काढले. ट्रक आणि बस दोन्ही वाहने उलटल्याने त्यातील चालक आणि प्रवाशांना वाचविण्यासाठी जवळपास २ तास बचाव कार्य (रेस्क्यु ऑपरेशन) सुरू होते. मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास स्वामी नारायण मंदिराजवळ हा अपघात घडला.
“ट्रकचालकाचे उतारावर नियंत्रण सुटले आणि…”
या अपघाताबाबत अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूरहून मुंबईकडे साखरेची पोती घेऊन निघालेल्या ट्रकचालकाचे उतारावर नियंत्रण सुटले आणि त्याने पुढे जात असलेल्या खासगी बसला जोरात धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती, की त्यात ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला. या अपघातात ट्रक उलटून त्यात ट्रकचालक अडकला. तसेच खासगी बसही उलटली. या अपघाताची माहिती मिळताच पुणे अग्निशमन दलाची ४ अग्निशमन वाहने, १ रेस्क्यु व्हॅन, पीएमआरडीएची १ रेस्क्यु व्हॅन तातडीने घटनास्थळी पोहचली.
हेही वाचा : VIDEO: गोष्ट पुण्याची-भाग ७७ : इ. स. पूर्व १२०० व्या शतकातील पांडवकालीन ‘बाणेश्वर लेणी’
उलटलेल्या बसच्या वरच्या बाजूच्या काचा फोडून आत अडकलेल्या प्रवाशांना हाताने आणि दोरीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. पुढील बाजूला काही महिला आणि एक मुलगी अडकली होती. कटरच्या सहाय्याने बाजूच्या वस्तू कापून सुटका करण्यात आली. ट्रकमधील चालकालाही बाहेर काढून रुग्णालयात रवाना केले.
या अपघातामुळे मुंबई-बंगलोर महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला होता. क्रेनच्या सहाय्याने दोन्ही वाहने सरळ करण्यात आली. तसेच रस्त्यावर पडलेली साखरेची पोती जेसीबीच्या सहाय्याने बाजूला केल्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत होऊ शकली.