मुंबई-पुणे बंगळुरू बाह्यवळण मार्गावर ट्रकवर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाले. सलील महंमद जलीस सौदागर (वय २२, रा. बावधन) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

अपघातात सलीलचा भाऊ वारीस महंमद समशाद सौदागर आणि आतेभाऊ अरबाज महंमद सौदागर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुचाकीस्वार सलील, त्याचा भाऊ वारीस आणि अरबाज रात्री साडेअकराच्या सुमारास दुचाकीवरून बाह्यवळण मार्गावरून जात होते. बाह्य‌वळण मार्गावर भरधाव दुचाकी ट्रकवर पाठीमागून आदळली.

हेही वाचा : पुणे : गुंड अप्पा लोंढेच्या खून प्रकरणात सहा जणांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा, सबळ पुराव्यांअभाव्यी नऊ जणांची निर्दोष मुक्तता

अपघातात सलील, त्याचा भाऊ वारीस आणि अरबाज गंभीर जखमी झाले. उपचारांपूर्वीच सलीलचा मृत्यू झाला. सहायक फौजदार मोहन देशमुख तपास करत आहेत.

Story img Loader