मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा बोर घाटात ट्रक आणि कारच्या विचित्र अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी सकाळी १०.३० च्या सुमारास बोर घाटात आडोशी बोगद्याजवळ हा अपघात झाला. पुण्याहून मुंबईच्या दिशेने चाललेला ट्रक आडोशी बोगद्याजवळ आल्यानंतर चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले व ट्रक मुंबई लेनवरुन पुणा लेनमध्ये घुसला व पलटी झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या अपघाताच्यावेळी पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या तीन गाडया ट्रकखाली चिरडल्या गेल्या. त्यात चौघांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. हा अपघात इतका भीषण होता की, एक कार १०० फूट खोल दरीत कोसळली. या ट्रकमध्ये सिमेंटच्या बॅगा भरलेल्या होत्या.

अपघातानंतर सर्व सिमेंट रस्त्यावर पसरल्याने पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच द्रुतगती मार्गावरील पोलीस आणि सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. सध्या अपघातग्रस्त वाहने आणि सिमेंट मार्गावरुन हटवण्याचे काम सुरु आहे.