उच्च शिक्षणातील विविध विद्याशाखांसाठी पुण्यातील शिक्षणसंस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना ‘विद्यार्थी सहायक समिती’तर्फे अल्पदरात निवास व भोजनाची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या वर्षी या योजनेअंतर्गत तीनशे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार असून त्यासाठीची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे.
प्रामुख्याने मराठवाडा व विदर्भ येथील दुष्काळग्रस्त भागातून उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले. प्रवेश प्रक्रियेत भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना फग्र्युसन रस्त्यावर पोलीस ग्राऊंडजवळ असलेल्या विद्यार्थी सहायक समितीतून प्रवेश अर्ज घ्यावा लागतो. तसेच http://www.samiti.org या संकेतस्थळावरही अर्ज व माहितीपत्रक उपलब्ध आहे. या प्रवेश अर्जाबरोबर जोडलेली कागदपत्रे तपासून विद्यार्थ्यांची मुलाखत घेतली जाते व त्यातून निवड होते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी कमवा व शिका योजनेत सहभाग नोंदवणे, संस्थेसाठी आठवडय़ातून चार तास काम करणे व विद्यार्थी विकास केंद्राच्या उपक्रमांमध्ये सहभागी होणे अनिवार्य असते. अधिक माहितीसाठी ०२०-२५५३३६३१, २५५३३७७८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही संस्थेतर्फे कळवण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा