पुणे: पदपथावर झोपण्याच्या वादातून एका ज्येष्ठ नागरिकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून करण्यात आल्याची घटना खडकी बाजार परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंगेश भागाजी भद्रिके (वय ७५, रा. खडकी रेल्वे स्थानकासमोर) असे खून झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी विकास रामचंद्र गायकवाड (वय ५२, रा. खडकी बाजार चौपाटी) याला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ यांनी या संदर्भात खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा… सावधान! हवेची गुणवत्ता खराब झाल्याने आरोग्याला धोका!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भद्रिके, गायकवाड खडकी बाजार परिसरात किरकोळ कामे करतात. दोघे जण खडकी रेल्वे स्थानकासमोर पदपथावर राहायला आहेत. दोघे परगावचे आहेत. पदपथावर झोपण्याच्या जागेवरुन त्यांच्यात वाद झाला होता. आरोपी गायकवाड दारु पिऊन रात्री आला. झोपेत असलेल्या भद्रिके यांच्यावर त्याने तीक्ष्ण शस्त्राने वार केले. गंभीर जखमी झालेल्या भद्रिके यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. पसार झालेल्या गायकवाडला पोलिसांनी अटक केली. पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accused arrested for killing an old man over dispute about sleeping on the footpath in khadki pune print news rbk 25 dvr