पुणे : आंघोळ करतानाचे व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल करून, तो व्हिडिओ डिलीट करण्यासाठी पीडित महिलेकडे शरीर सुखाची आणि पैशांची मागणी करणार्या आरोपीला वानवडी पोलिसांनी नाशिक येथून अटक केली आहे.कृष्णा संपत शिंदे वय २० रा.चव्हाण मळा नाशिक असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही नाशिक येथे राहण्यास होती.तिचे लग्न झाल्यावर ती पुण्यात आली. नाशिक येथे पीडित महिला राहण्यास असताना आरोपी कृष्णा शिंदे याने पीडित महिला आंघोळ करीत असताना. तो व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. या व्हिडिओ बाबत पीडित महिलेस माहीती झाली. त्यानंतर आरोपीला पीडित महिलेने जाब विचारत व्हिडिओ डिलीट करण्यास सांगितला. त्यावर आरोपी कृष्णा शिंदे याने पीडित महिलेकडे शरीर सुखाची मागणी किंवा ३० हजार रुपये रोख रकमेची मागणी केली.
आणखी वाचा-‘मोक्का’ कारवाई केलेल्या गुंडाकडून हाॅटेलची तोडफोड, धानोरीतील हाॅटेल चालकाकडे खंडणीची मागणी
या सर्व घडलेल्या प्रकाराबाबत पीडित महिलेने आमच्याकडे तक्रार दिली.त्यानुसार पोलिस अंमलदार अमोल पिलाने, अतुल गायकवाड यांनी तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर आरोपी कृष्णा शिंदे हा नाशिकमध्ये असल्याचे दिसून आले.त्यानंतर आमच्या टीमने नाशिक गाठून आरोपीला अटक केली.वरीष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमाने, गुन्हे शाखेचे निरीक्षक गोविंद जाधव, उपनिरीक्षक धनाजी टोणे,दया शेगर, सुजाता फुलसुंदर यांच्या पथकाने कारवाई केली आहे.तर या घटनेचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.