लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: सोसायटीत घरकामासाठी जात असलेल्या महिलेशी बोलण्याचा प्रयत्न करून तिने दुर्लक्ष केले असतानाही अश्लिल चाळे करून विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका तरुणाला अटक केली.

शेख अबुझर शेह सहजाद (वय २२, रा. बैंगणवाडी, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबात एका ३४ वर्षीय महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला घरकाम करते. दरम्यान, नेहमीप्रमाणे त्या येथील सोसायटीत घर कामासाठी जात असताना सोसायटीच्या आवारात शेखने जवळीक साधत बोलण्याचा प्रयत्न केला. महिलेने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यावेळी त्याने महिलेशी अश्लील चाळे करत त्यांचा विनयभंग केला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accused arrested for molesting a housemaid in pune print news rbk 25 dvr