पुणे : कर्नाटकातील भारतीय जनता पक्षाच्या माजी जिल्हा उपाध्यक्षाचा वैमनस्यातून खून करून पसार झालेल्या आरोपीला पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने मंगळवार पेठेतून अटक केली. आरोपीला कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मयूर लक्ष्मण खेत्रे (वय २६, रा. सदाआनंदनगर, मंगळवार पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अजित मलिनाथ छत्री (वय २७, रा. सरसांबा, आळंद, गुलबर्गा), आकाश उर्फ आण्णा लालसिंग कामाटी (वय२७, रा. मंगळवार पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ते पसार झाले आहेत. महांतप्पा सिद्रामप्पा आलुरे (वय ४७, रा. आळंद, कलबुर्गी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी गुलबर्गा येथील मादन हिप्परगा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल आहे. यातील छत्री हा मुख्य आरोपी असून तो गुलबर्गा परिसरात राहायला आहे. छत्री आणि आलुरे यांच्यात वाद झाले होते. आलुरे भारतीय जनता पक्षाचा माजी जिल्ह्याध्यक्ष होते. ते धनलक्ष्मी को-ऑपरेटीव्ह सोसायटीचे अध्यक्ष होते.

हेही वाचा >>>पिंपरी: आचारसंहितेच्या शक्यतेने राजकारण्यांप्रमाणेच प्रशासकांचीही धावपळ; तब्बल ‘इतक्या’ कोटींच्या कामांना मंजुरी

छत्रीने आलुरे यांचा खून करण्याचा कट रचला. त्याने पुण्यातील मंगळवार पेठेत राहणाारा नातेवाईक खेत्रे आणि कामाटी यांना बोलावून घेतले. गुरुवारी (२९ फेब्रुवारी) गुलबर्गा परिसरातील सरसांबा येथेे आलुरे यांना अडवून त्यांच्यावर कोयत्याने वार केले. त्यानंतर छत्री, कामाटी, खेत्रे पसार झाले. खेत्रे मंगळवार पेठेत आल्याची माहिती तांत्रिक तपासात मिळाली. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमाेल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक निरीक्षक राजेश माळगावे, उपनिरीक्षक मोहनदास जाधव, प्रदीप शितोळे, सुरेंद्र जगदाळे, सचिन अहिवळे, शंकर संपते, तुषार भिवरकर यांनी सापळा लावून खेत्रेला पकडले. त्याला कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accused arrested from pune who killed a bjp official in karnataka pune print news rbk 25 amy