लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: अनैतिक संबंधाच्या संशयावरून प्रेयसी आणि तिच्या दोन लहान मुलांचा खून करून त्यांचे मृतदेह जाळणाऱ्या आरोपीस कोंढवा पोलिसांनी अटक केली. तो गावी पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला तपास पथकाने सापळा लावून पकडले.
वैभव रूपसेन वाघमारे (वय २६, रा. मु.पो. लोहटा, ता. औसा, जि. लातूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. वाघमारे याने भावजय आम्रपाली रमेश वाघमारे (वय २४), आदित्य (वय ४) आणि रोशनी (वय ६) यांचा खून केला. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांचे मृतदेह जाळून टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
आणखी वाचा-हॉटेल व्यावसायिकांनी घनकचरा व्यवस्थापन करावे; आयुक्त शेखर सिंह यांचे आवाहन
आरोपी वैभव भावजय आणि तिच्या दोन लहान मुलांसह पिसोळी भागात राहत होता. तो गावी पसार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष सोनवणे आणि पोलीस निरीक्षक संजय मोगले यांना मिळाली. तपास पथकाने त्याला सापळा लावून ताब्यात घेतले.