पुण्यात भांडणे सोडविल्याने एकाने पोलीस कर्मचाऱ्याच्या मनगटाचा चावा घेतल्याची घटना विश्रांतवाडीतील एकतानगर भागात घडली. प्रीतम जंगम असे जखमी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी बाजीराव बाळू सुकळे (वय ३३, रा. कर्वेनगर) याला अटक करण्यात आली आहे.
पोलीस कर्मचारी हनुमान जयंतीच्या बंदोबस्तावर एकताननगर भागात होते. त्यावेळी आरोपी बाजीराव सुकळे आणि बजरंग दगडे यांच्यात किरकोळ कारणावरुन वाद झाला. बंदोबस्तावरील पोलीस कर्मचारी जंगम यांनी भांडणाची घटना पाहिली. त्यांनी सुकळे आणि दगडे यांच्यातील भांडणे सोडविली.
हेही वाचा : “तुम्ही देवाकडे पण वेळेवर जात नाहीत, हनुमान चालिसा…”, पुण्यात जयंत पाटलांचा राज ठाकरेंवर निशाणा
भांडणे सोडविल्याने सुकळेला राग आला. त्याने जंगम यांच्या मनगटाचा चावा घेतला. सरकारी कामात अडथळा आणणे, मारहाण केल्याप्रकरणी सुकळेला अटक करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. माळी तपास करत आहेत.