पुणे प्रतिनिधी: विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या लॉकअपमधील आरोपीने बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. शिवाजी गरड असे गळफास घेतलेल्या आरोपीच नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युनिट सहाने हडपसर येथील वाहन चोरीच्या गुन्ह्यात आरोपी शिवाजी गरड याला अटक केली होती. त्यानंतर त्याला विश्रामबाग येथील लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. आज पहाटेच्या सुमारास बाथरूमला जाऊन बराच वेळ झाला तरी देखील शिवाजी गरड बाहेर आला नाही. त्यानंतर ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी खिडकीतून पाहिले असता शिवाजी गरड याने बेड शीटच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. पोलिसांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर शिवाजी गरड याला रूग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी मृत घोषित केले.