लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : कोंढवा परिसरात एकावर हल्ला करून पसार झालेल्या पाच आरोपींना नगर जिल्ह्यातील एका गावातून अटक करण्यात आली. पोलिसांचे पथक मागावर असल्याचे समजताच आरोपी शेतात मचाण बांधून तेथे राहत होते.

Vinesh Phogat pune, Vinesh Phogat,
क्रीडा क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या तरुणींना हा त्रास होऊ नये – विनेश फोगट
investment fraud in stock market 75 lakh fraud by cyber thieves Pune news
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकार वाढीस; सायबर…
Order of tadipar, gangsters in Yerawada, Yerawada,
येरवड्यातील चार गुंडांना तडीपार करण्याचे आदेश
Sharad Pawar tweet, Sharad Pawar,
‘निष्ठा काय असते’ शरद पवार यांचं ट्विट चर्चेत, अजित पवार गटाचे हडपसरचे आमदार चेतन तुपे यांना सुनावले
In last four days pistols and MD powder were seized from four accused in nagpur
पुणे-सातारा रस्त्यावर टोळक्याची दहशत, वैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार
Telangana CM Revanth Reddy, Revanth Reddy Pune,
भाजपच्या ‘बटेंगे तो कटेंगे’चा मतदानावर परिणाम नाही? तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी दिले उत्तर
pune metropolis have lack of basic facilities and infrastructure
बकालीकरणाकडे…
Thieves stole gold ornaments and ₹55,000 cash from an elderly woman at Navsha Maruti temple
शहरात ज्येष्ठ नागरिकांच्या फसवणुकीचे सत्र कायम, सिंहगड रस्ता, कोंढवा भागातील घटना
traffic system in Swargate area will changed on Tuesday November 19 and Wednesday November 20 pune
स्वारगेट भागात दोन दिवस वाहतूक बदल, मतदान साहित्याच्या वाहतुकीसाठी पीएमपी बस

शहबाज मोइउद्दीन खान (वय ३०, रा. कृष्णानगर, महंमदवाडी), बालाजी मिन्ना मंगाली (वय ३५, रा. येवलेवाडी), सूरज राजेंद्र सरतापे (वय २५, रा. चिमटा वस्ती, फातिमानगर), जुबेर कद्दुस कुरेशी (वय ३५, रा. कासेवाडी, भवानी पेठ), रॉकी ॲथोंनी (वय ३१, रा. वानवडी बाजार) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

आणखी वाचा-श्री शिवजयंतीनिमित्त मध्यभागातील वाहतुकीत बदल, ‘या’ रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने

कोंढव्यातील समतानगर एका तरुणावर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर आरोपी पसार झाले होते. आरोपी शहबाज याचे नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात बेलापूर येथे शेत आहे. शहबाज आणि त्याचे साथीदार शेतात मचान बांधून तेथे राहत होते. पोलिसांचे पथक त्यांच्या मागावर होते. शहबाज आणि साथीदार बेलापूर गावातील शेतात वास्तव्यास असून, पोलिसांच्या नजरेस पडू नये म्हणून ते रात्री मचाणावर झोपायचे. या बाबतची माहिती पोलीस हवालदार सतीश चव्हाण आणि विशाल मेमाणे यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून आरोपींना बेलापूर गावातून अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, गुन्हे शाखेचे निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक दिनेश पाटील, लेखाजी शिंदे, बालाजी डिगोळे, सतीश चव्हाण, लवेश शिंदे, निलेश देसाई, शाहीद शेख, लक्ष्मण होळकर, संतोष बनसुडे यांनी ही कारवाई केली.