लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : कोंढवा परिसरात एकावर हल्ला करून पसार झालेल्या पाच आरोपींना नगर जिल्ह्यातील एका गावातून अटक करण्यात आली. पोलिसांचे पथक मागावर असल्याचे समजताच आरोपी शेतात मचाण बांधून तेथे राहत होते.

शहबाज मोइउद्दीन खान (वय ३०, रा. कृष्णानगर, महंमदवाडी), बालाजी मिन्ना मंगाली (वय ३५, रा. येवलेवाडी), सूरज राजेंद्र सरतापे (वय २५, रा. चिमटा वस्ती, फातिमानगर), जुबेर कद्दुस कुरेशी (वय ३५, रा. कासेवाडी, भवानी पेठ), रॉकी ॲथोंनी (वय ३१, रा. वानवडी बाजार) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

आणखी वाचा-श्री शिवजयंतीनिमित्त मध्यभागातील वाहतुकीत बदल, ‘या’ रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने

कोंढव्यातील समतानगर एका तरुणावर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर आरोपी पसार झाले होते. आरोपी शहबाज याचे नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात बेलापूर येथे शेत आहे. शहबाज आणि त्याचे साथीदार शेतात मचान बांधून तेथे राहत होते. पोलिसांचे पथक त्यांच्या मागावर होते. शहबाज आणि साथीदार बेलापूर गावातील शेतात वास्तव्यास असून, पोलिसांच्या नजरेस पडू नये म्हणून ते रात्री मचाणावर झोपायचे. या बाबतची माहिती पोलीस हवालदार सतीश चव्हाण आणि विशाल मेमाणे यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून आरोपींना बेलापूर गावातून अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, गुन्हे शाखेचे निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक दिनेश पाटील, लेखाजी शिंदे, बालाजी डिगोळे, सतीश चव्हाण, लवेश शिंदे, निलेश देसाई, शाहीद शेख, लक्ष्मण होळकर, संतोष बनसुडे यांनी ही कारवाई केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accused hide on the scaffolding to avoid the police pune print news rbk 25 mrj
Show comments