पुणे : मानलेल्या बहिणीच्या चार वर्षांच्या मुलीवर अत्याचार करुन पसार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथकाने पकडले. अत्याचार केल्यानंतर पसार झालेल्या आरोपीचा पोलिसांकडून गेले दोन दिवस शोध घेतला जात होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विजय स्वामी बामु (वय ४०, रा. घोरपडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. बामु याने मानलेल्या बहिणीच्या चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गु्न्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता. बालिकेवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडल्यानंतर रहिवासी संतप्त झाले होते. रहिवाशांनी त्याचा शोध घेतला होता. मात्र, त्याचा ठावठिकाणा लागला नव्हता.

हे ही वाचा…मुख्यमंत्र्यांचा एक निर्णय अन् महापालिकेचे काही कोटींचे नुकसान; ३२ गावांमधील मालमत्ता कर वसुलीला राज्य सरकारची स्थगित

गुन्हे शाखेचे दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथक मुंढवा परिसरात गस्त घालत होते. रेल्वे उड्डाणपुलाजवळ आरोपी बामू थांबल्याची माहिती पोलीस कर्मचारी विक्रांत सासवडकर यांना मिळाली. सापळा लावून पोलिसांनी त्याला पकडले. पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांच्या मार्गदर्शनाखाली छबू बेरड, दत्तात्रय खरपुडे, विनायक रामाणे, गणेश गोसावी, संदीप येळे यांनी ही कारवाई केली. आरोपीला मुंढवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

हे ही वाचा…Maharashtra Polls 2024 : पिंपरी-चिंचवडमध्ये काँग्रेसचे २२ जण विधानसभेसाठी इच्छुक

शहरात गेल्या काही महिन्यांपासून शाळकरी मुलांवरील अत्याचााराच्या घटना वाढीस लागल्या आहेत. शाळांमध्ये योग्य आणि अयोग्य स्पर्शाबाबत समुपदेशन करण्यात आले आहे. समुपदेशानमुळे अत्याचारांच्या गुन्ह्यांना वाचा फुटली आहे. लष्कर भागातील एका शाळकरी मुलावर अत्यचाार करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती. याप्रकरणी अल्पवयीनाविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेण्यात आले होते. कोंढवा भागात शाळकरी मुलावर सोसायटीतील मुलांनी अत्याचार करण्याची घटना नुकतीच घडली होती.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accused in pune molested sisters four year old daughter caught by crime branch pune print news rbk 25 sud 02