पुणे : बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांना धक्का देऊन हडपसरमधील मगरपट्टा चौकीतून पसार झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. प्रीतम चंदूलाल ओसवाल (वय ३२, रा. ऊरळी देवाची, सासवड रस्ता) असे पसार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ओसवाल याच्याविरुद्ध रात्री उशिरा हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ओसवाल आणि एका महिलेची समाजमाध्यमातून ओळख झाली होती. ओसवालने महिलेला न्यायालयीन प्रकरणात मदत करण्याचे आमिष दाखवून तिच्याशी जवळीक निर्माण केली. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. ओसवालने समाजमाध्यमात छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी महिलेला दिली होती. याप्रकरणी महिलेने फिर्याद दिल्यानंतर ओसवालला पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्याच्या तपासासाठी त्याला सोमवारी रात्री हडपसर भागातील मगरपट्टा चौकीत आणण्यात आले होते. त्यावेळी तेथे असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना धक्का देऊन तो पसार झाला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accused in rape case escape from magarpatta police station pune print news rbk 25 ysh