विवाहाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी एकास अटक केली आहे. अमोल आनंद मान (वय २९, रा. गुजरात काॅलनी, कोथरुड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित तरुणीने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा- कुख्यात गुंड गजा मारणेला न्यायालयीन कोठडी
अमोल आणि पीडितेची ओळख होती. त्याने तिला विवाहाचे आमिष दाखविले. त्यानंतर तरुणीला जाळ्यात ओढून अमोलने तिच्यावर बलात्कार केला. अमोलने मोटार घेतली होती. मोटारीचे हप्ते भरण्यासाठी त्याने पीडितेकडून वेळोवेळी साडेतीन लाख रुपये घेतले. पीडितेने विवाहाबाबत त्याच्याकडे विचारणा केली. तेव्हा त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक यादव तपास करत आहेत.