डोक्यावर झालेला कर्जाचा डोंगर फेडण्यासाठी श्रीमंत असलेल्या मित्राला लुबाडण्याच ठरल असताना दारूच्या नशेत त्याची हत्या केली आणि पैकी एक मित्र हा मुंबईत तृतीयपंथी म्हणून तर दुसरा मूळ गावी जाऊन राहात होता. अखेर या दोघांना पिंपरी- चिंचवड च्या गुन्हे शाखा युनिट एकने अटक केली आहे. सचिन हरिराम यादव असं हत्या झालेल्या तरुणाच नाव आहे. याप्रकरणी रोहित नागवसे आणि गोरख जनार्दन फल्ले या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन हरिराम यादव हा श्रीमंत घरचा मुलगा असून त्यांची एक कंपनी आहे. यातून यादव कुटुंबाला चांगला पैसा मिळतो. हेच हेरून आरोपींनी सचिन सोबत जवळीक साधून यादव कुटुंबाला लुटायचं असा प्लॅन ठरला. पैकी, आरोपी रोहित हा त्यांच्याच परिसरात राहत असल्याने त्याने सचिन सोबत जवळीक साधत मैत्री केली. अनेकदा काही व्यवहार करण्यासाठी सचिन जायचा तेव्हा आरोपी रोहित देखील सोबत असायचा. दरम्यान, २४ ऑगस्ट रोजी तिघेही खेड येथील जंगलात दारू प्यायला बसले त्यावेळेस दोघांनी सचिनच्या डोक्यात दगडाने मारून त्याची हत्या केली. दोघेही दारूच्या नशेत असल्याने त्यांनी नेमकं काय केले समजलच नाही आणि ते पळून गेले.

मुलगा घरी परतला नाही. म्हणून यादव कुटुंबाने म्हाळुंगे पोलीस ठाण्यात सचिन बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलिसांनी देखील गांभीर्याने तपास करत तपासाची चक्रे फिरवत तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींपर्यंत पोहोचले. अगोदर, मुंबईत एक महिना तृतीयपंथी म्हणून राहणाऱ्या रोहित नागवसे याला अटक केली. मग बीड जिल्ह्यातील केज येथून गोरख फल्ले याला बेड्या ठोकल्या. दोन्ही आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक असल्याच समोर आल आहे. रोहित आणि गोरख दोघेही कर्जबाजारी झाले होते आणि तेच कर्ज सचिनच्या माध्यमातून फेडायचे होते. सचिनच्या कुटुंबाला लुटायचं होतं त्या अगोदरच त्याची हत्या केल्याने कर्ज मात्र फिटलं नाही पण दोघेही जेरबंद झाले. हे कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या टीमने केली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accused rohit nagwase and gorakh janardan phalle a rich friend was killed by debt ridden friends kjp 91 ysh
Show comments