लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आरोपी पसार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पसार झालेल्या आरोपीचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

बाळू उर्फ चक्रधर गोडसे (वय ३०, रा. टाकळी लोणार, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी प्रकाश मांडगे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी गोडसे याच्या विरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गोडसे याला उपचारांसाठी ससून रुग्णालयातील मनोरुग्ण कक्षात दाखल करण्यात आले होते. बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचारी प्रकाश मांडगे आणि सहकारी तेथे होते.

हेही वाचा… पुणे: खडकीतील दारुगोळा कारखान्यातील महिलेचा भररस्त्यात भोसकून खून

बंदोबस्तास असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे लक्ष चूकवून आरोपी गोडसे रुग्णालयातून पसार झाला. त्यानंतर पोलीस कर्मचारी मांडगे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accused runs away from sassoon hospital pune pune print news rbk 25 dvr
Show comments