पुणे: पुणे शहरातील कात्रज भागातील सिंहगड कॉलेज परिसरात कोयत्याने हल्ला करुन दहशत पसरवणाऱ्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. तर ज्या परिसरात कोयता घेऊन दहशत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.त्याच ठिकाणी भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपींची धिंड काढली.तन्मय सखाराम भुयारी ( वय २० रा. सध्या सिंहगड कॅम्पस, वडगाव, पुणे मुळ रा. बुलढाणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड कॉलेज परिसरातील चंद्रागण कॅपिटल या मुख्य इमारतीच्या गेटजवळ नागरिकांची मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ असते.पण ८ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास चहा पिण्यासाठी थांबलेल्या तरुणावर आरोपी तन्मय भुयारी आणि त्याच्या एका साथीदाराने कोयत्याने वार केल्याची घटना घडली.तर या प्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी पथक विविध भागात रवाना करण्यात आली होती.यातील आरोपी काही तासात ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असून या आरोपींकडे अधिक चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.

कुख्यात गुंड सनी जाधव टोळीवर मोक्का

पुणे शहरातील विविध भागात खंडणी मागणे,खुनाचा प्रयत्न,घातक शस्त्रे बाळगून दहशत निर्माण करण्यासह विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे कुख्यात गुंड सनी शंकर जाधव याच्यासह टोळीवर होते.तर या सर्व गुन्ह्याअंतर्गत पुणे पोलिसांनी सनी जाधव टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. सनी शंकर जाधव ( वय २६ रा. चैत्रबन वसाहत बिबवेवाडी) सलमान हमीद शेख ( वय २५ रा. दिलासा अपार्टमेंट, बालाजीनगर, धनकवडी) हर्षल संतोष चव्हाण (वय १९ रा. पवळे चौक, कसबा पेठ, शक्ती गुरव रा. लातूर) अशी मोक्का कारवाई केलेल्यांची नावे आहेत.तर शक्ती गुरव याला अद्याप पोलिसांनी अटक केलेली नसून त्याचा शोध सुरू आहे.

सनी जाधव आणि त्याच्या टोळीवर जबरदस्तीने लूटमार,मारहाण करणे,अवैध मार्गाने घातक शस्त्र बाळगणे, घातक हत्यारांसह दुखापत करणे, लोकांना दमदाटी करुन हत्याराचा धाक दाखवुन मारहाण करणे, जबरदस्तीने मालमत्ता लुटणे, खुनाचा प्रयत्न, खंडणी अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.