लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुणे : मित्राचा खून करुन पसार झालेल्या आरोपीला बंडगार्डन पोलिसांनी ससून रुग्णालयाच्या परिसरातून अटक केली. आरोपीला खेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सलमान अबुलगणी शेख (वय २३, सलमान सोफा फर्निशिंग,.वडगाव शिंदे रस्ता .आळंदी,मूळ रा. अलिपूर बाजार, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

खेड तालुक्यातील खरपुडी फाटा परिसरात शेखने मित्र शरद गायकवाड याचा ३ नोव्हेंबर रोजी चाकूने भोसकून खून केला होता. मित्राचा खून केल्यानंतर तो पसार झाला होता. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंडगार्डन पोलिसांचे पथक ससून रुग्णालय परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी शेख ससून रुग्णालय परिसरात थांबला होता. त्याला संशयावरुन पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशी त्याने मित्र शरद गायकवाडचा खून केल्याची कबुली दिली. शेखला पोलिसांनी खेड पोलिसांच्या ताब्यात दिले.

आणखी वाचा-अमेरिकेत कमला हरली, तशी इथे कमळाबाई हरणार; खासदार संजय राऊत यांची भाजपवर टीका

पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त दीपक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड, गुन्हे शाखेचे निरीक्षक संपतराव राऊत यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक धीरज गुप्ता, उपनिरीक्षक स्वप्नील लोहार. उपनिरीक्षक प्रदीप शितोळे, मोहन काळे, पोलीस कर्मचारी महेश जाधव, ज्ञाना बडे, शिवाजी सरक, मनोज भोकरे, मनीष संकपाळ यांनी ही कारवाई केली.