शहर परिसरातून चोरलेल्या दुचाकींची विक्री करुन मौजमजा करणाऱ्या एका तरुणास भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. चोरट्याने भारती विद्यापीठ, हडपसर, शिक्रापूर परिसरातून दुचाकी चोरल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
शेखर चंद्रकांत चव्हाण (वय ३४, रा. हरणी, ता. पुरंदर) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.

हेही वाचा- पुणे: धायरीत हॉटेल व्यवस्थापकचा खून; पोलिसांकडून शोध सुरु

शहरात दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. आंबेगाव परिसरातील लिपाणे वस्ती भागात एकजण थांबला असून त्याच्याकडे असलेली बुलेट चोरीची असल्याची माहिती पोलीस कर्मचारी हर्षल शिंदे आणि धनाजी धोत्रे यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून चव्हाणला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी करण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे असलेली बुलेट चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. चौकशीत चव्हाणने पुणे शहर; तसेच परिसरातून चार दुचाकी चोरल्याची कबुली दिली. चव्हाण याच्याकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. चव्हाण याच्या विरोधात यापूर्वी दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल झाले होते.

हेही वाचा- नगर रस्ता परिसरात १४ लाखांचा गुटखा जप्त; गुटखा वाहतूक करणारा टेम्पो चालक अटकेत

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक धीरज गुप्ता, रवींद्र चिप्पा, अवधूत जमदाडे, सचिन सरपाले, नितेश खैरमोडे, राहुल तांबे, आशिष गायकवाड, अभिनय चौधरी, मितेश चोरमले, विक्रम सावंत आदींनी ही कारवाई केली.

Story img Loader