पुणे : ससून रुग्णालयातून आरोपी पसार झाल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले. पोलीस शिपाई निखिल अरविंद पासलकर, पोलीस शिपाई पोपट कालूसिंग खाडे अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. गुंड शरद मोहोळ याची पत्नी स्वाती हिला धमकी दिल्याप्रकरणी मार्शल लीलाकर ( रा. आकुर्डी) याला अटक करण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मार्शलने समाजमाध्यमात स्वाती यांना धमकी देणारी ध्वनिचित्रफीत प्रसारित केली होती. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास करून मार्शलला अटक केली होती. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिले होते.. फरासखाना- विश्रामबाग पोलीस ठाण्यातील कोठडीत (लॉकअप) मार्शलला ठेवण्यात आले होते. त्याने रविवारी पहाटे छातीत दुखत असल्याचे सांगितले. त्यानंतर सायबर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई पासलकर आणि खाडे त्याला घेऊन ससून रूग्णालयात गेले.

हेही वाचा…नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यात…‘सीबीआय’चा युक्तिवाद संपला

बाह्य रूग्ण उपचार कक्षात मार्शलची तपासणी सुरू असताना तो पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला. मार्शल पसार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीने त्याचा शोध सुरू केला. त्याच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशीत पोलीस कर्मचारी खाडे आणि पासलकर यांनी कर्तव्यात कसुरी केल्याचे आढळून आल्याने दोघांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accused who threatened sharad mohol s wife escapes from sassoon hospital two police suspended pune print news rbk 25 psg