पुणे : गुंड शरद मोहोळ याची पत्नी स्वाती हिला धमकी दिल्या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी ससून रुग्णालयातून पसार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस झाली आहे. मार्शल लुईस लीलाधर असे पसार झालेल्यांचे नाव आहे.

मोहोळ याचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. मोहोळची पत्नी स्वाती हिला समाजमाध्यमातून धमकी देण्यात आली होती. याबाबत तिने पोलिसांकडे तक्रार केली होती. पोलिसांनी तपास करून मार्शलला अटक केली होती. त्याला येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. त्याची तब्येत बरी नसल्याने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र मार्शल बंदोबस्तावरील पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली आहेत.

Senior police inspector arrested while accepting a bribe of three and a half lakhs
पावती न देता दंडवसुली करणाऱ्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Two Ramnagar police officers received show cause notice for negligence in womans
हिट अँड रन प्रकरणाच्या तपासात दिरंगाई, दोन पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस
man throws acid on wife face shocking incident in malvani
तृतीयपंथीयाशी प्रेमसंबंध असल्याचे समजताच पत्नीनं मागितला घटस्फोट, पतीनं पत्नीच्या चेहर्‍यावर ॲसिड फेकलं
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ प्रकृती बिघडल्याने बॉम्बे रुग्णालयात, पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्यातून करण्यात आलं एअरलिफ्ट
death case of pregnant women and newborn child in bhandup Court orders JJ Hospital authorities to explain
गर्भवती, नवजात बालकाच्या मृत्युचे प्रकरण : जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठत्यांना उपस्थित राहून स्पष्टीकरण देण्याचे न्यायालयाचे आदेश
Fraud with doctor by give lure of installing solar power system in hospital
पुणे : रुग्णालयात सौर उर्जा यंत्रणा बसविण्याच्या आमिषाने डॉक्टरची फसवणूक
Petition to High Court to Create clear rules for compensation after damages due to electric shock
विजेचा धक्का लागल्याने अपघात, नुकसान भरपाईसाठी स्पष्ट नियमावली तयार करा; उच्च न्यायालयात याचिका

हेही वाचा…“…तरच तुम्ही पुण्याचे पोलीस आयुक्त”, संजय राऊतांनी दिलं खुलं आव्हान; म्हणाले, “..त्यांना घाबरलात का?”

या पूर्वी अमली पदार्थ तस्कर ललित पाटील ससूनमधून पसार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांना निलंबित करण्यात आले होते.