मोत्यासारखे अक्षर हा लेखनातील विशेष गुण मानला जातो. वळणदार अक्षर ही एक कला मानली जाते. त्याला सुलेखन म्हणजेच कॅलिग्राफी असे संबोधिले जाते. या अक्षराला वळण लागावे यासाठी प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांनी देवनागरी सुलेखन कित्ता तयार केला आहे.
गेल्या ३३ वर्षांहून अधिक काळ सुलेखन अभ्यासामध्ये व्यतीत करणारे अच्युत पालव यांनी या देवनागरी सुलेखन कित्त्याची मांडणी केली आहे. त्यांच्या ‘काना मात्रा वेलांटी’ या पुस्तकाचे शनिवारी (११ जुलै) प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर आणि चैतन्यमहाराज देगलूरकर यांच्या हस्ते होणार आहे. वेदशास्त्रोत्तेजक सभा येथे सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
अच्युत पालव म्हणाले, विद्यार्थ्यांपासून ते कलारसिकांपर्यंत अगदी सहजपणे वळणदार आणि डौलदार देवनागरी लिपी कशी लिहिता येईल याची प्रचिती या कित्त्याद्वारे शिकता येणार आहे. अतिशय बाळबोध पद्धतीने स्वर आणि व्यंजनांची आकारवार विभागणी केली आहे. एका अक्षराचा सराव करताना त्यातून दुसरे-तिसरे अक्षर शिकता येणार आहे. ‘व’ हे अक्षर शिकताना त्यातून ‘ब’ आणि ‘क’ हे अक्षर तयार होते. असे १२ गट केले असून शिकायला आणि समजून घ्यायला सोपे ठरणार आहे. प्रत्येक अक्षराचा सुरुवातीपासून शेवटपर्यंत स्ट्रोक कसा असावा हेसुद्धा दाखविण्यात आले आहे. याशिवाय प्रत्येक अक्षराच्या सरावासाठी जागा सोडण्यात आली आहे. स्वर, व्यंजन, अंक, विरामचिन्हे याबरोबरच अक्षरांच्या मूळ आकारांचा वापर करून विविध रचना कशा करू शकता याचा आढावाही घेण्यात आला आहे. अक्षरांच्या विविध वळणांचा काही भाग समाविष्ट करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा