पुणे : बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने सात बांगलादेशी महिलांना अटक केली आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील बुधवार पेठेमध्ये काही बांगलादेशी नागरिक बेकायदा वास्तव्य करत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने छापा टाकून सात बांगलादेशी महिलांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या महिला गेल्या चार वर्षांपासून पुण्यात बेकायदा वास्तव्य करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
हेही वाचा – पुणे : महापालिका कर्मचाऱ्यांची दसऱ्यापूर्वीच दिवाळी; ८.३३ टक्के बोनस जाहीर
हेही वाचा – पिंपरी-चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले, “मी लोकसभेसाठी इच्छुक…”
पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली. त्यांच्याकडे वस्तव्याबाबतची कागदपत्रे आढळून आली नाहीत. सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस हवालदार इरफान शेरखान पठाण यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फरासखाना पोलीस तपास करत आहेत. पोलीस अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत जाधव, सहाय्यक निरीक्षक अश्विनी पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळगावे, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, तुषार भीवरकर, अजय राणे, इरफान पठाण, अमेय रसाळ, हनुमंत कांबळे, अमित जमदाडे, किशोर भुजबळ, ओंकार कुंभार, रेश्मा कंक आदींनी ही करवाई केली.