पुणे : महाविद्यालयीन अभ्यासक्रमावर आधारित पुस्तकांच्या छायांकित प्रतींची विक्री करण्याचा प्रकार टेक्नालोज पब्लिकेशन प्रकाशन संस्थेने उघडकीस आणला आहे. प्रकाशन संस्थेने पोलिसांची मदत घेऊन छायांकित प्रती काढून देणाऱ्या दुकानावर छापा टाकून छायांकित प्रती केलेल्या पुस्तकांसह दोन लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या प्रकरणी सिद्धराज देवराज बंगाली (वय ३८, सध्या रा. बालाजीनगर, धनकवडी), हिंदू देवा भरवाड (वय १९), गोविंद देवराज बंगाली (वय १९, दोघे सध्या रा. आंबेगाव खुर्द) यांच्या विरोधात स्वामित्व हक्क कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत टेक्नोलेज पब्लिकेशन्सचे कायदेशीर सल्लागार सचिन मारुती गायकवाड (वय ३८, रा. बालाजीनगर, धनकवडी) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा >>> पुणे: रुपीच्या पाच लाखांपर्यंतच्या रकमेसाठी ठेवीदारांना ३१ डिसेंबरपर्यंत मुदत

आरोपी मूळचे गुजरातचे आहेत. गायकवाड यांच्यावर प्रकाशन संस्थेने पुस्तकांची छायांकित प्रतींची विक्री करणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाईची जबाबदारी सोपविली होती. सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरात ‘नाईस झेराॅक्स सेंटर’मध्ये अभ्यासक्रमावर आधारित पुस्तकांच्या छायांकित प्रतींची विक्री केली जात असल्याची माहिती गायकवाड यांना मिळाली. विद्यार्थ्यांना कमी दरात या प्रतीची विक्री करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गायकवाड यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वर्षा घोगरे, कर्मचारी वीर, घोडके, जनवाड यांनी या सेंटरवर छापा टाकला. पोलिसांनी संगणक आणि छायांकित प्रती असा दाेन लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.