पिंपरी : किवळे येथील बेकायदा लोखंडी जाहिरात फलक (होर्डिंग) कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासनाने शहरातील बेकायदा फलक काढण्यास सुरुवात केली खरी, पण ही कारवाई अतिशय संथ गतीने सुरू आहे. गुरुवारी दिवसभरात केवळ चारच फलक काढण्यात आले. दरम्यान, महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात ६५ हून अधिक बेकायदा जाहिरात फलक आढळले आहेत.

किवळे येथील दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. लोखंडी जाहिरात फलक (होर्डिंग) धारकांना संरचना मजबुतीचे (स्थिरतेचे) प्रमाणपत्र आणि जाहिरात फलकाच्या आकाराचे छायाचित्र पाठविण्यास सांगितले. जाहिरात फलक धारकांना खडे बोल सुनावले. शहरात ४३३ बेकायदा लोखंडी फलक असल्याची महापालिका दफ्तरी नोंद आहे. त्याचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. पण, याव्यतिरिक्तही शहराच्या विविध भागात बेकायदा फलक आहेत. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात ६५ हून अधिक बेकायदा जाहिरात फलक आढळले आहेत.

father raped his fourteen year old daughter
स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या बापास बारा वर्षाची सक्त मजुरी !
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
devendra fadnavis poster of badlapur encounter
‘बदला पूरा….’ दहिसरमधील फलक हटवले, आमदार मनीषा चौधरी पालिका अधिकाऱ्यांवर संतापल्या
mumbai municipal corporation
मुंबई: महापालिकेतील उपायुक्तांची पुन्हा खांदेपालट, राज्य सरकारकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्याकडे प्रथमच शिक्षण विभागाची जबाबदारी
Devendra Fadnavis on Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरलेल्या अर्जाचे पैसे कधी येणार? लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीसांनी दिली माहिती
nmmc removed illegal hoarding in navi mumbai
नवी मुंबई : बेकायदा फलकबाजीवर पालिकेची कारवाई; २ हजार ५१६ फलक हटवले
Bombay HC
उच्च न्यायालयाने केंद्र सरकारचा ‘fake news’ fact check rule मोडीत का काढला? त्रयस्थ न्यायाधीशांची गरज का भासली?
Action taken against by municipal corporation panel makers instead of ganesh mandal
गणेश मंडळांना अभय; फलक तयार करणाऱ्यांवर कारवाई

हेही वाचा… वर्चस्व राहण्यासाठी सांगवीत हवेत गोळीबार

या फलकांमुळे अपघात होण्याची भीती आहे. किवळेतील दुर्घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने जाहिरात फलकांवरील कारवाई हाती घेतली. पण, कारवाईचा वेग संथ आहे. आकाशचिन्ह व परवाना विभागाने गुरुवारी शहरातील बेकायदा फलक, बोर्ड काढण्याच्या कामास सुरुवात केली. मुंबई-बंगळुरु सेवा रस्ता, हिंजवडी रोड येथील दोन आणि ताथवडेतील पवारनगर येथील एक असे केवळ चारच बेकायदा फलक दिवसभरात काढले आहेत. बेकायदा जाहिरात फलकधारक स्वतःहून फलक काढत असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा… पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने ८१ लाखांची फसवणूक

महापालिकेने बेकायदा जाहिरात फलक काढण्यास सुरुवात केली आहे. शहराच्या सर्वच भागातील बेकायदा फलक काढण्यात येणार आहेत. – नीलेश देशमुख, सहाय्यक आयुक्त, आकाशचिन्ह व परवाना विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका