लक्ष्मी रस्त्यावरील इमारतीच्या बेसमेंट पार्किंगचा मान्य नकाशापेक्षा वेगळ्या कारणांसाठी वापर करणाऱ्यांवर महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या बांधकाम विभागाने चार हजार चौरस फुटांचे बांधकाम कारवाईअंतर्गत पाडले.बांधकाम विकास विभागाचे अधीक्षक अभियंता सुधीर कदम, कार्यकारी अभियंता प्रवीण शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन क्रमांक सातच्या शाखा, कनिष्ठ अभियंता आणि उपअभियंता तसेच आरेखक सहायक यांच्या पथकाने बुधवारी सकाळी कारवाई केली.
हेही वाचा >>>पुणे: महासाथीच्या काळात ४७ टक्के महिला कायमस्वरूपी बेरोजगार
गेल्या पंधरा दिवसांत महापालिकेने ट्युलीप इंजिनिअर्स यांच्या सहाय्याने सिटी पोस्ट चौक ते टिळक चौक या दरम्यानचे सविस्तर सर्वेक्षण करून बेसमेंट, पार्किंगचा मान्य नकाशापेक्षा वेगळा वापर करणाऱ्यांना नोटीसा बजावल्या होत्या. या भागात असणाऱ्या सात मिळकतींमधील दहा ठिकाणी मान्य नकाशापेक्षा वेगळ्या कारणासाठी वापर करणाऱ्या मिळकतींना महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या पथकाने कारवाई केली.