पुणे : कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील अनेक गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. या प्रकल्पातील सांडपाण्यामुळे परिसरातील जलस्रोत प्रदूषित होत असल्याची बाबही समोर आली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला नोटीस बजावली आहे.

कुरकुंभ एमआय़डीसीतील जलप्रदूषणाचा प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे. एमआयडीसीतील सांडपाणी नाल्यांमध्ये जाऊन त्यामुळे जलस्रोत प्रदूषित होत असल्याची तक्रार येथील नागरिक वारंवार करीत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने ही नोटीस बजावली आहे. मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जगन्नाथ साळुंखे यांनी २५ सप्टेंबरला कुरकुंभ एमआयडीसीला नोटीस बजावली आहे. त्यात एमआयडीसीतील सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

cost of Ten thousand crore pollution free project in Watad Panchkroshi says Uday Samant
प्रदूषण विरहीत वाटद पंचक्रोशीत दहा हजार कोटींचा प्रकल्प; उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा…
SRA project to be done along Mumbai-Bangalore highway
पुणे: मुंबई- बंगळुरु महामार्गालगत होणार एसआरए प्रकल्प; प्रकल्प रद्द होण्याकरिता ‘त्या’ व्यक्तीने घेतल्या मृत व्यक्तींच्या सह्या?
noise pollution pune marathi news
पुणेकरांनो, शहरातील ध्वनिप्रदूषणाची पातळी तुम्हीच तपासा! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा पुढाकार
Information of Samarjit Ghatge that Shahu factory will set up bio CNG solar power plant Kolhapur news
शाहू कारखाना बायो सीएनजी,सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार; समरजित घाटगे यांची माहिती
MMRDA considers three options for soil disposal
ठाणे : एमएमआरडीएकडून माती विल्हेवाटीसाठी तीन पर्यायांचा विचार
Hatnur, Aner, Jalgaon, Dhule, water release Hatnur,
अनेर, हतनूरमधून विसर्गामुळे जळगाव, धुळ्यातील नदीकाठच्या नागरिकांना इशारा
Satara, Water storage, Koyna, Dhome,
सातारा : कोयना, धोम, उरमोडी, तारळी धरण ९६ टक्क्यांवर; प्रमुख प्रकल्पातील पाणीसाठा १४५ टीएमसीवर

हेही वाचा >>>कृषी सेवेच्या २५८ जागांसाठी एमपीएससीकडून अर्ज प्रक्रिया सुरू… काय आहे अंतिम मुदत?

नोटिशीमध्ये म्हटले आहे की, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या ठिकाणी जमिनीत मुरणारे सांडपाणी रोखण्यासाठी एमआयडीसीने पुढील सात दिवसांत कृती आराखडा सादर करावा. याचबरोबर इतर संस्थांच्या मदतीने जल परीक्षण दर तीन महिन्यांनी करावे. एमआयडीसीने जुन्या जलवाहिन्या आणि सांडपाणी वाहिन्या या वर्षाच्या अखेरपर्यंत बदलाव्यात. एमआयडीसीतील जलवाहिन्यांमध्ये गळती झाल्यास तिथून सांडपाणी पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळू शकण्याचा धोका आहे. त्यामुळे हे निर्देश देण्यात आले आहेत. उद्योगांमधून बाहेर पडणारे सांडपाणी रोखण्यासाठी एमआयडीसीने पावले उचलावीत. यात एमआयडीसीने समन्वय संस्था म्हणून काम करावे.

कुरकुंभ एमआयडीसीतील सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाबाबत दिलेल्या निर्देशांचे पालन केल्याचा मासिक अहवाल एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना देण्यास सांगण्यात आले आहे. अन्यथा एमआयडीसीवर कायदेशीर कारवाई करण्याचे पाऊल उचलावे लागेल.- जगन्नाथ साळुंखे, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस मिळाली आहे. याआधीही मंडळाने नोटीस दिली होती. त्यानुसार कार्यवाही केली जात आहे. जुनी जलवाहिनी आणि सांडपाणी वाहिनी बदलण्याचे काम सुरू आहे. याचबरोबर सांडपाणी तपासणीही दरमहा केली जात आहे.- विजय पेटकर, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ