पुणे: आंबेगाव बुद्रुक येथील अनधिकृत बांधकामांवरील कारवाईचा धडाका महापालिकेने कायम ठेवला आहे. आंबेगाव येथील सर्वेक्षण क्रमांक ४३, २५ आणि १० येथील विनापरवाना बांधकामांवर मंगळवारी कारवाई करण्यात आली. त्यामध्ये ४७ हजार ६६४ चौरस फुटांचे क्षेत्र मोकळे करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आंबेगाव बुद्रुक येथील (जुनी हद्द) विनापरवाना मिळकतधारकांना महाराष्ट्र महापालिका कलमानुसार नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतर बांधकाम पाडण्याची कारवाई करण्यात आल्याची माहिती बांधकाम विभागाकडून देण्यात आली. अतिक्रमण विभागाकडील कर्मचारी, बिगारी सेवा, पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा… पिंपरी: अग्निप्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देण्यास व्यावसायिकांकडून टाळाटाळ; ४३ हजार जणांकडून अपूर्ण माहिती, होणार कारवाई

यापुढेही बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, गेल्या आठवड्यात आंबेगाव येथील ११ बेकायदा इमारतींवर बांधकाम विभागाकडून कारवाई करण्यात आली होती.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action on unauthorized constructions in budruk ambegaon pune print news apk 13 dvr
Show comments