लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : महापालिकेचा अग्निशामक विभाग आणि आठही क्षेत्रिय कार्यालयाकडून फटाका स्टॉलसाठी परवानगी देण्यात येत आहे. आतापर्यंत ६० व्यावसायिकांनी परवानगी घेतली आहे. विनापरवाना फटाके स्टॉलवर कारवाईचा इशारा अग्निशामक विभागाने दिला आहे.

Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
PMPML bus caught fire in swargate depot
स्वारगेट आगारात पीएमपी बसला आग; कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे आग आटोक्यात
Pimpri, Female computer operator bribe, computer operator bribe Female, bribe,
पिंपरी : सहाशे रुपयांची लाच घेताना संगणक चालक महिला अटकेत
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड
cash seized south mumbai ahead of assembly elections in maharashtra
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत कारवाई ; सव्वा दोन कोटींची रोख जप्त

दिवाळीचा सण काही दिवसांवर आला आहे. फटाके विक्रेत्यांची लगबग सुरू आहे. शहरात दरवर्षी अनेक स्टॉल परवानगी न घेताच उभारले जातात. परंतु, यंदा महापालिकेने कडक धोरण राबविण्याचा निश्चय केला आहे. महापालिकेची परवानगी घेऊनच स्टॉल उभारावेत, असे आवाहन महापालिकेच्या वतीने व्यावसायिकांना करण्यात आले आहे. अग्निशामक विभाग आणि आठही क्षेत्रीय कार्यालयाकडून शुल्क आकारून स्टॉलला परवानगी देण्यात येत आहे.

आणखी वाचा-पिंपरीतील व्यावसायिक मालमत्तांचे अग्निप्रतिबंधात्मक सर्वेक्षण सुरू

शहर परिसरातून फटाके स्टॉल उभारण्यासाठी ६० जणांनी अर्ज केले होते. त्यांना अग्निशामक विभागाने परवानगी दिली आहे. बेकायदेशीर फटाका स्टॉल उभारल्यास क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागातर्फे कारवाई करण्यात येणार आहे. आगीच्या घटना टाळण्यासाठी स्टॉलशेजारी वाळू ठेवावी. फटाका स्टॉल परिसरात, बिडी, सिगारेट पेटवू नये, ज्वलनशिल पदार्थ ठेवू नये, स्टॉलपासून लहान मुलांना दूर ठेवावे. पाण्याची व्यवस्था ठेवावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

अग्निशामक विभागाने एक हजार रुपये परवानगी शुल्क आकारून ६० फटाके स्टॉलधारकांना परवानगी दिली आहे. व्यावसायिकांनी फटाका स्टॉल उभारण्यापूर्वी महापालिकेची रितसर परवानगी घ्यावी. नियमांचे पालन करावे. -विजयकुमार थोरात, सहायक आयुक्त, अग्निशामक विभाग