शहरातील येवले चहा विक्री केंद्राच्या कोंढव्यातील उत्पादन केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) मंगळवारी कारवाई करण्यात आली. त्यानंतर त्या केंद्रातून शहरातील येवले चहाच्या हॉटेलमध्ये  पुरविण्यात येणारी चहा पावडर, तसेच चहा मसाल्याचे उत्पादन थांबविण्याचे आदेश देण्यात आले. अन्न व सुरक्षा मानके कायद्याचा भंग केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा- ऑनलाइन फसवणुकीचे सत्र कायम

‘एफडीए ’कडून करण्यात आलेल्या कारवाईत सहा लाखांचा माल जप्त करण्यात आला. त्याचे नमुने राज्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. येवले चहामध्ये आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या ‘मेलानाईट’ या पदार्थाचा वापर केला जात असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत तेथून चहा पावडर, चहा मसाला, साखरेचे पुडे जप्त करण्यात आले. पुडय़ांवर उत्पादन दिनांक तसेच अन्य काही माहिती लावणे बंधनकारक आहे. मात्र, जप्त करण्यात आलेल्या प्लास्टिकच्या पुडय़ांवर कोणताही उल्लेख नसल्याचे उघडकीस आले. एफडीएचे सहाय्यक आयुक्त सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action on yevle chaha abn