पुणे : पुण्यातील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा दंडुका उगारला. आता सर्वसामान्य नागरिकांसोबत आरटीओने सरकारी कर्मचाऱ्यांवरही कारवाई सुरू केली आहे. पुण्यातील राज्य आणि केंद्र सरकारी, निमसरकारी कार्यालये, सरकारी संस्था आणि बँकांसह इतर सरकारी कार्यालयांमध्ये प्रत्यक्ष जाऊन कारवाई केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आरटीओकडून शहरातील रस्ते अपघातांचे तुलनात्मक विश्लेषण करण्यात आले होते. त्यात शहरातील सर्वाधिक अपघात हे दुचाकीस्वार आणि पादचारी यांच्याशी निगडित असल्याची बाब समोर आली होती. याचबरोबर अपघातांमध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांमध्येही दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे आरटीओच्या वायूवेग पथकांनी बेशिस्त दुचाकीस्वारांवर कारवाई सुरू केली. त्यात हेल्मेट परिधान न करणाऱ्या दुचाकीस्वारांवर प्रामुख्याने कारवाई करण्यात आली.

हेही वाचा – महावितरणच्या कर्मचाऱ्याला ग्राहक मंचाकडून कारवाईचा ‘शॉक’

पुण्यात राज्य आणि केंद्र सरकारची अनेक कार्यालये आहेत. तसेच राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक संस्था शहरात आहेत. निमसरकारी कार्यालये आणि राष्ट्रीयीकृत बँकांची कार्यालयेही पुण्यात आहेत. आरटीओने या कार्यालयात दुचाकीवरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना हेल्मेट वापरण्याबाबत जनजागृती करण्याचे काम हाती घेतले होते. आरटीओने जनजागृतीनंतर आता थेट कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना विनाहेल्मेट दुचाकीवरून कार्यालयात जाणे महागात पडू लागले आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांकडून पाचशे रुपयांचा दंड वसूल केला जात आहे.

या कारवाईबाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे म्हणाले की, नियम न पाळणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांवर आम्ही रस्त्यांवर कारवाई करीत आहोत. त्याचवेळी नियमभंग करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवरही त्यांच्या कार्यालयात जाऊन कारवाई सुरू केली आहे. सरकारी कर्मचारी या नात्याने त्यांनी अधिक जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. दुचाकी चालवताना हेल्मेट परिधान करून ते स्वत:च्याच जिवाची काळजी घेत आहेत. त्याचबरोबर सुरक्षेबाबत एक चांगला संदेशही ते देऊ शकतात.

हेही वाचा – प्रसिद्ध खाटूश्याम मंदिरापर्यंत आता थेट रेल्वेने जाता येणार

सुरुवातीच्या काळात आरटीओच्या वायूवेग पथकांकडून सरकारी कार्यालयांमध्ये हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्यात आली. आता प्रत्यक्ष कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. आमचे कर्मचारी जाऊन कोणत्याही सरकारी कार्यालयात तपासणी करीत आहेत. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनी दुचाकी चालवताना हेल्मेट परिधान करून दंड टाळावा, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे म्हणाले.