पुणे : ससून रुग्णालयामधून अमली पदार्थ तस्कर आरोपी ललित पाटील हा पळून गेल्यानंतर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले असून सात नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर पुणे पोलिसांनी ललित पाटील आणि टोळीवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार मोक्का कारवाई केली आहे. पण ललित पाटील याला ससून रुग्णालयात अनेक गोष्टींसाठी मदत करणारे ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना सहआरोपी करून मोक्काअंतर्गत कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आमदार रविंद्र धंगेकर यांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – अधिकाऱ्यांची दिवाळी, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे दिवाळे

हेही वाचा – पुणे : ताराचंद रुग्णालयाच्या विद्यार्थिनींच्या वसतिगृहात आग

रविंद्र धंगेकर म्हणाले की, ससून रुग्णालयामधून ललित पाटील पळून गेल्यापासून पोलिसांच्या ताब्यात येण्यापर्यंत अनेक आरोपींची नावे समोर आली आहेत. त्या दरम्यान संबधित आरोपीकडून तपासादरम्यान लाखो रुपये आणि काही किलो सोने पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे एकच वाटते की, ललित पाटील हा ससून रुग्णालयात उपचार घेत होता त्यावेळी त्या ठिकाणी असणारे डॉक्टर, पोलीस या सर्व यंत्रणांना पैसे किंवा सोने ललित पाटील हा देत होता. तसेच तो तेथूनच अमली पदार्थ विक्रीचे रॅकेट चालवित होता. ललित पाटील पळून गेल्यानंतर त्यावेळी रुग्णालयात ड्युटीवर असलेल्या पोलिसांवर कारवाई झाली. पण या ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्याबद्दल मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि या विभागाचे मंत्री कोणत्याही प्रकारची भूमिका घेताना दिसत नाही. त्यामुळे यातून एकच दिसते की, सर्वजण संजीव ठाकूर यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. जोपर्यंत संजीव ठाकूर यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई होत नाही. तोपर्यंत आवाज उठवत राहणार, अशी भूमिका मांडली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action should also be taken against sassoon sanjeev thakur says mla ravindra dhangekar svk 88 ssb