न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करीत रात्री दहा वाजेनंतरही आवाजाचा दणदणाट करणाऱ्या द डेली रेस्टॉरंट अॅण्ड बारवर सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली. तेथील २ लाख ३० हजार रुपये किमतीची ध्वनियंत्रणा जप्त करण्यात आली असून बारच्या व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा >>>उच्चभ्रू भागातील महिलांशी अश्लील संभाषण; दिल्लीतून महिलेसह दोघे अटकेत
सामाजिक सुरक्षा विभागील अधिकारी कर्मचारी शनिवारी गस्त घालत असताना रात्री दहा वाजल्यानंतरही कोरेगाव पार्कमधील गल्ली क्रमांक सातमध्ये असलेल्या द डेली रेस्टॉरंट अॅण्ड बारमध्ये संगीताचा मोठा आवाज सुरू होता. त्यामुळे पथकाने त्याठिकाणची ध्वनियंत्रणा जप्त केली. ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, एपीआय अश्विनी पाटील, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, संदीप कोळगे, अमित जमदाडे यांनी केली.