मुंबई-पुणे रस्त्यावरील पाटील इस्टेट भागात दहशत माजविणाऱ्या गुंड टोळीविरूद्ध पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले.

हेही वाचा >>>पुणे : दिवाळी खरेदीची गर्दी ; शहरभर कोंडी

nylon manjha, Kite festival
नायलॉन मांज्यामुळे दुचाकीस्वार जखमी, पतंग महोत्सवाच्या आयोजकांवर गुन्हा
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Vandalism ,ransom , shopkeeper, Shivne area,
पुणे : दुकानदाराकडे खंडणीची मागणी करुन तोडफोड, शिवणे भागात सराइताची दहशत
national women commission form fact finding committee in murder of a girl Inside bpo premises
‘बीपीओ’च्या आवारातील युवतीच्या खूनप्रकरणी सत्यशोधन समिती; राष्ट्रीय महिला आयोगाचा निर्णय; दहा दिवसांत अहवाल
Pune, kidnappers , Crime Branch action,
पुणे : अपहरण करणारे गजाआड, गुन्हे शाखेची कारवाई, आर्थिक व्यवहारातून अपहरण
Satara District Sessions Judge , pre-arrest bail ,
अटकपूर्व जामिनाच्या मागणीसाठी सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश उच्च न्यायालयात
youth who attacked builder gets 10 year jail
बांधकाम व्यावसायिकावर कुऱ्हाडीने वार करणाऱ्या तरुणाला सक्तमजुरी; न्यायालयाकडून आरोपीला पाच लाखांचा दंड
Court orders on state government officials regarding land compensation
‘भरपाई टाळण्यासाठी कायद्याचे बेधडक उल्लंघन’; राज्य सरकारी अधिकाऱ्यांवर न्यायालयाचे ताशेरे

या प्रकरणी टोळी प्रमुख अल्ताफ मोहम्मद शेख (वय २०), तौसिफ उर्फ अमन दस्तगीर शेख (वय २२), अदिल जावेद शेख (वय १९), आसिफ शेरू शेख (वय १८), गफूर जिलानी सय्यद (सर्व रा. पाटील इस्टेट, वाकडेवाडी, मुंबई-पुणे रस्ता) यांच्यासह साथीदारांच्या विरोधात मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. अल्ताफ शेख आणि साथीदारांनी पाटील इस्टेट भागात दहशत माजविली होती. त्यांच्या विरोधात मालमत्तेचे नुकसान करणे, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, सदोष मनुष्यवध, खंडणी मागणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा >>>कारागृहातून आठ दिवसांपूर्वीच आला बाहेर आणि पुन्हा ‘आत’ गेला !

खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदूम, आर. के. जाधव, विकास घायतडक यांनी अल्ताफ शेख टोळीच्या विराेधात मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. अतिरिक्त पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, उपायुक्त रोहिदास पवार, सहायक आयुक्त आरती बनसोडे यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास पोलीस आयुक्तांनी मंजुरी दिली. गेल्या दीड वर्षात शहरातील १०१ गुंड टोळ्यांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे.

Story img Loader