येरवडा भागात दहशत माजविणारा गुंड अनिकेत उर्फ दत्ता साठे याच्यासह साथीदारांच्या विरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले.
हेही वाचा- पुण्यात फुरसुंगीमध्ये कोयता गँगची दहशत; घरे, गाड्यांवर दगडफेक
अनिकेत उर्फ दत्ता राजू साठे (वय २१), आदित्य सतीश घमरे (वय १९), रौनक उर्फ टक्या अजेश चव्हाण (वय २०), अभय चंद्रकांत जंगले (वय २१), अमन गणेश भिसे (वय २०), ऋतिक राजू साठे (वय २२), राजू कचरु साठे (वय ५०, सर्व रा. येरवडा) अशी कारवाई करण्यात आलेल्या गुंडाची नावे आहे. या प्रकरणात राजू साठे याला अटक करण्यात आले असून त्याचे साथीदार पसार झाले आहेत.
हेही वाचा- पुणे : खडकीमधील श्रीकृष्ण मंदिरातील दानपेटी चोरणारा तरुण अटकेत
अनिकेत साठे आणि साथीदारांनी मदर टेरेसा नगर परिसरात दहशत माजविण्याचे गुन्हे केले अहोत. त्यांच्या विरु्दध खून, खुनाचा प्रयत्न, दहशत माजवणे, तोडफोड असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या टोळीच्या विरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, गुन्हे शाखेचे निरीक्षक उत्तम चक्रे, उपनिरीक्षक रवींद्रकुमार वारंगुळे, अकुंश डोंबाळे यांनी तयार केला होता. अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा, उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक आयुक्त किशोर जाधव यांनी या प्रस्तावाची पडताळणी केली. त्यानंतर साठे आणि साथीदारांवर मोक्का कारवाईचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत शहरातील १४ गुंड टोळ्यांच्या विरुद्ध मोक्का कारवाई केली आहे.