भारती विद्यापीठ, तसेच सहकारनगर भागात दहशत माजविणाऱ्या गुंडाविरोधात पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचे आदेश दिले. गुंडाला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्तांनी आतापर्यंत शहरातील चार गुंडांविरोधात ‘एमपीडीए’ कायद्यान्वये कारवाई केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – पुणे : मार्केट यार्ड परिसरात पिस्तूल बाळगणाऱ्या गुंडाला पकडले

हेही वाचा – घोटाळेबाज नीरव मोदीच्या पुण्यातील फ्लॅटला ग्राहकच मिळेना; पुन्हा होणार लिलाव, कर्ज आणि फ्लॅटची रक्कम किती?

अजिंक्य संतोष काळे (वय २१, रा. गणेशनगर, आंबेगाव पठार) असे कारवाई केलेल्या गुंडाचे नाव आहे. त्याच्या विरुद्ध सहा गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. काळेविरुद्ध कारवाई करण्याचा प्रस्ताव भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पाेलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट आणि गुन्हे प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक सुरेखा वाघमारे यांनी तयार केला होता. या प्रस्तावास पोलीस आयुक्तांनी मंजुरी दिली. त्यानुसार काळे याला वर्षभरासाठी नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात येणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action under mpda against gangsters causing terror pune print news rbk 25 ssb