लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारांनी प्रचार फेरीत दहांपेक्षा अधिक वाहने वापरण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच दोन ताफ्यातील अंतर दोनशे मीटर आणि पंधरा मिनिटांचे असावे, असे आदेश पुणे पोलिसांकडून देण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असे सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी कळविले आहे.

Offense against speaker along with organizer due to offensive statements
आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वक्त्यासह आयोजकावर गुन्हा
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Solapur district bank scam
सोलापूर जिल्हा बँक घोटाळ्याची ३२ तत्कालीन संचालकांवर जबाबदारी, ११०३ कोटी रुपये गैरव्यवहार प्रकरण, ऐन निवडणुकीत निर्णयाने खळबळ
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
mla ashok pawar son kidnapped
Ashok Pawar: आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण करून दहा कोटींची खंडणी, अश्लील चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी
fraud of 19 lakh with youth by cyber thieves
पुणे : सायबर चोरट्यांकडून तरुणाची १९ लाखांची फसवणूक
thane model code of conduct crime loksatta news
आचारसंहिता भरारी पथकाचीच खंडणीखोरी, शेतमालाच्या पैशांवर डल्ला, १३ दिवसांनंतर गुन्हा दाखल
Cases of violation of Model Code of Conduct in Pune during poll campaign
आचारसंहिता भंगाचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल; सिंहगड रस्ता पोलिसांकडून कारवाई

विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्याअनुषंगाने पुणे पोलिसांनी नियमावली जाहीर केली आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शिरुर, पुरंदर, भोर, वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरुड, खडकवासला, पर्वती, हडपसर, पुणे कॅन्टोंमेंट आणि कसबा अशा ११ विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. या मतदारसंघातील निवडणुका शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी आचारसंहितेचे काटेकोरपणे अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत.

आणखी वाचा-‘कसब्या’त ब्राह्मण उमेदवार हवा, विविध ब्राह्मण संघटनांची मागणी

त्यानुसार सभा, मिरवणूक, सभेचे ठिकाण आणि वेळ याबाबतची संबंधित पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना द्यावी. पोलीस परवानगीनंतर सभा, मिरवणुकीचे आयोजन करण्यात यावे. ध्वनीक्षेपकाबाबत सर्वोच्च न्यायालायने दिलेल्या आदेशाचे पालन करावे. रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत ध्वनीक्षेपक वारण्यास बंदी आहे, असे सहपोलीस आयुक्त शर्मा यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे. संबंधित आदेश २५ नोव्हेंबर मध्यरात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत. आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

आणखी वाचा-पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील इच्छुकांवर फुली? श्रीनाथ भिमाले, दिलीप कांबळे यांची मंडळावर वर्णी

पोलिसांचे आदेश काय ?

  • शाळा, महाविद्यालय, रुग्णालयाच्या परिसरात ध्वनीक्षेपकाचा वापर करु नये
  • प्रचार वाहनांनी ध्वनीक्षेपकाचा वापर वाहन थांबवून करावा
  • ध्वनीक्षेपक वापराचा परवाना बाळगणे बंधनकारक
  • ध्वनीक्षेपक वापर, निश्चित केलेल्या वेळेवर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी नियंत्रण ठेवावे