पुणे : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याची घटना घडली. यावरून राज्यातील राजकारण तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहे.
संभाजी भिडे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. या मागणीसाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. या सर्व घडामोडी लक्षात घेता संभाजी भिडे यांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता असून राज्य सरकारने संभाजी भिडे गुरुजी यांना पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते सचिन थोरात यांनी पुणे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्याकडे केली आहे.
हेही वाचा – पर्यावरण बदलामुळे जीवसृष्टीसमोर गंभीर संकट?
यावेळी सचिन थोरात म्हणाले की, संभाजी भिडे गुरुजी समाजात प्रबोधनाचे काम करीत आहेत. आजपर्यंत त्यांनी संदर्भ देऊन भूमिका मांडली आहे. पण मागील काही दिवसांपूर्वी संभाजी भिडे गुरुजी यांनी केलेल्या विधानानंतर काही राजकीय व्यक्ती चुकीच्या पद्धतीने विधान करीत आहेत. त्या गोष्टीचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि गुरुजींबद्दल अपशब्द थांबवावी, अन्यथा आम्हीदेखील जशाच तसे उत्तर देऊ, अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली.