लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पुणे : मुंबईसारख्या रात्रंदिवस धपापणाऱ्या शहरात चित्रकार म्हणून केलेली सुरुवात, सत्यदेव दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली नाट्य क्षेत्रातील कारकीर्द आणि चित्रपट क्षेत्रातील घवघवीत यश असा कॅनव्हास, रंगमंच आणि रुपेरी पडद्यावरील अमोल पालेकर यांच्या सहा दशकांच्या कला कारकिर्दीचा ‘ऐवज’ वाचकांच्या हाती येणार आहे.
प्रसिद्ध चित्रकार, अभिनेता-दिग्दर्शक अमोल पालेकर यांच्या ऐंशीव्या वाढदिवसाचे औचित्य साधून मधुश्री पब्लिकेशनच्या वतीने ‘व्यूफाइंडर’ या इंग्रजी आणि ‘ऐवज’ या आत्मकथनपर मराठी पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी (२३ नोव्हेंबर) मुंबईमध्ये आणि रविवारी (२४ नोव्हेंबर) पुण्यात होणार आहे. यानिमित्ताने स्वत:चा वेगळा चेहरा निर्माण केलेल्या एका मनस्वी मराठी कलाकाराची नवी ओळख वाचकांना होणार असून पालेकर यांच्या कलात्मक प्रवासाला आकार देणाऱ्या अनुभवांचा तपशील वाचकांना समृद्ध करणारा ठरेल.
आणखी वाचा-या गावातील कागदपत्रे तातडीने हस्तांतरित करा, पालिकेला राज्य सरकारने का दिला आदेश?
पालेकर यांच्या आत्मकथनातून भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगातील काही मौल्यवान क्षणचित्रे गवसतात. व्यक्तिगत आठवणी, दुर्मीळ छायाचित्रे आणि सत्यदेव दुबे, बादल सरकार, हृषिकेश मुखर्जी, बासू चटर्जी, जयदेव वर्मा अशा नाट्य-चित्रपट जगतातील दिग्गजांना पालेकर यांनी अर्पण केलेले श्रद्धांजलीपर मनोगत समाविष्ट करण्यात आले आहे. पुस्तकामध्ये दिलेल्या ‘क्यूआर कोडमुळे पालेकर यांच्या कलाकृती बघण्याची संधी वाचकांना लाभणार आहे.
मधुश्री पब्लिकेशनचे शरद अष्टेकर म्हणाले, ’अशा प्रकारच्या पुस्तकाचा प्रथमच प्रयोग आम्ही केला आहे. पालेकर यांचे कलामय आणि निर्भिड जीवन वाचकांना उलगडणार आहे. आत्मकथा लेखनाची ही शैलीही नवी असून ती वाचकांना नक्की आवडेल. एका अवलियाने निवडलेल्या अनवट वाटा, पावलोपावली पेललेली आव्हाने आणि त्यांच्या कलेला नवीन दिशा देणारे अनेक प्रसंग वाचकांना समृद्ध करतील.
आणखी वाचा-मावळमध्ये प्रसिद्ध बैलगाडा मालकाची ५० लाखांच्या खंडणीसाठी हत्या; नेमकं प्रकरण काय?
माझा इथवरचा प्रवास न्याहाळताना, कला क्षेत्रातील परिवर्तनाचा आवाका, व्याप्ती आणि खोली लक्षात येईल. पडद्यावर दिसणाऱ्या भोळसट नायकापलीकडच्या माणसाची जडणघडण समजून घेता येईल. -अमोल पालेकर, प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक