मावळ लोकसभा महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी सिनेअभिनेते गोविंदा आले होते. शहरातील पिंपरी चौकातून बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी गोविंदा आणि उमेदवार बारणे हे एकाच गाडीतून लोकांना अभिवादन करत होते. मावळ लोकसभेसाठी पहिल्यांदाच सिनेसृष्टीतील अभिनेत्याला निवडणुकीसाठी आणण्यात आले आहे. यावेळी अभिनेता गोविंदा यांच्या हस्ते बारणेंच्या संपर्क कचेरीचे उद्घाटन करण्यात आलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – … तर विद्यार्थ्यांवर दाखल करणार फौजदारी गुन्हे; तंत्रशिक्षण संचालनालयाचा इशारा

हेही वाचा – उन्हाळ्यामुळे फळभाज्यांची आवक कमी; पालेभाज्या तेजीत

पिंपरीतून प्रचार रॅलीला सुरुवात झाली. नागरिकांचा या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेकजण गोविंदाचा फोटो मोबाईलमध्ये घेण्यासाठी आतुर होते. श्रीरंग बारणे हे शिवसेनेचे उमेदवार असून अभिनेता गोविंदा हे देखील शिवसेनेचा भाग आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. शहरातील विविध भागांतून ही रॅली काढण्यात आली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor govinda campaigned for maval lok sabha candidate shrirang barne kjp 91 ssb