कविता कुठेही सुचू शकते, अगदी स्मशानातही. मात्र, सुचण्याची प्रक्रिया मनात अनेक दिवसांपासून सुरू असते. उत्कृष्ठ कविता सुचण्यासाठी आणि तिच्या सादरीकरणासाठी शब्दसंचय, संवाद कौशल्य आणि चौकस दृष्टीकोन असला पाहिजे, असे मत प्रसिध्द कवी, अभिनेते किशोर कदम तथा सौमित्र यांनी भोसरीतील कविसंमेलनात बोलताना व्यक्त केले. भोसरी कला, क्रीडा मंचच्या वतीने आयोजित गणेश महोत्सवाअंतर्गत काव्यमैफिलीत सौमित्र यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला. संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ कवी म. भा. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. पिंपरी प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, संस्थेचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे, विजय फुगे, भरत लांडगे आदी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> पिंपरी: विजेचा खेळखंडोबा, अघोषित भारनियमनामुळे उद्योगनगरीत लघुउद्योजक त्रस्त

सौमित्र म्हणाले, आपल्या भोवतालच्या परिस्थितीशी आणि निसर्गाशी एकरूप होऊन आनंदाचे क्षण वेचत जगता आले पाहिजे. वैयक्तिक पातळीवर तसेच समाजातील विविध घटकांबाबत घडणाऱ्या घटनांचे विश्लेषण, पडसाद कवींच्या कलाकृतीत दिसतात. माझे बालपण समुद्रकिनारी गेले. त्यामुळे ‘लाटा’ ही कविता सुचली. एका नाटकाचा सेट उभारताना ‘लग्नं’ ही रचना केली. अभिनय आणि कविता या माझ्या दोन सादरीकरणाच्या बाजू आहेत. कवितेला सन्मान मिळवून देण्यासाठी होणारे उपक्रम निश्चितपणे कौतुकास्पद आहेत.