लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी मतदान सुरू आहे. कलाकारही मतदान केंद्रावर जात आपला मतदानाचा हक्क बजावीत आहेत. मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने निगडी प्राधिकरणातील ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय या मतदान केंद्रावर जात मतदान केले.
आणखी वाचा-मावळ : महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या विरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार
सर्वांनी घरातून बाहेर पडावे आणि मतदान करावे. मी केले सर्वांनी मतदान करावे, असे आवाहन करत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाली, की मतदानादिवशी मतदार इकडे तिकडे फिरायला जातात असे मला वाटत नाही. लोक मतदान करत नाहीत, याची अनेक कारणे असू शकतात. लोकांचा कोणावरच विश्वास राहिला नाही. त्यामुळे कोणाला मत द्यावे, का द्यावे, त्यातून का होणार आहे पुढे असे बरेच प्रश्न लोकांसमोर निर्माण झाले आहेत. या प्रश्नांना उत्तर द्यायचे असेल, किंबहुना हे का घडतेय, त्याच्या बद्दल प्रश्न विचारायचे असतील, तक्रारी करायच्या असतील तर मतदानाचा हक्क बजवावा.