पिंपरी पालिकेतील नवे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी शुक्रवारी (२३ सप्टेंबर) पदभार स्वीकारला. यापूर्वी ते वसई-विरारचे उपआयुक्त म्हणून कार्यरत होते.विकास ढाकणे यांची बदली झाल्यानंतर अतिरिक्त आयुक्तपदावर पालिकेतील उपआयुक्त स्मिता झगडे यांची वर्णी लागली होती. तथापि, या पदावर रुजू होण्यापूर्वीच त्यांची पदोन्नती रद्द करण्यात आली. त्यांना मूळ पदावर काम करण्याचे आदेश देण्यात आले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
हेही वाचा >>> पुणे : खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीत चोरी करणाऱ्या महिला अटकेत ;पुणे, गोवा, हैद्राबादमधील सराफी पेढीत चोरी
त्या जागेवर जांभळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जांभळे शुक्रवारी सकाळीत शहरात दाखल झाले. काही प्रमुखांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर दुपारी मुख्यालयात येऊन त्यांनी पदभार स्वीकारला.
First published on: 23-09-2022 at 17:38 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Additional commissioner of pimpri municipal corporation pradeep jambhale assumed charge pune print news amy