यूआयडीएआयची नवी सुविधा
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
प्रथमेश गोडबोले, पुणे</strong>
ज्यांच्याकडे पत्त्याचा पुरावा नाही, अशा नागरिकांना पत्त्याच्या पुराव्याशिवाय त्यांच्या रहिवासाचा चालू पत्ता आधार कार्डावर अद्ययावत करता येणार आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडिया- यूआयडीएआय) ही नवी सुविधा नुकतीच उपलब्ध करून दिली आहे. मात्र संबंधित जागेच्या मालकाची त्याचा पत्ता नोंदवायला संमती आवश्यक असेल.
रहिवासाचा चालू पत्ता अद्ययावत करताना ही सुविधा वापरणाऱ्या व्यक्तीच्या नावाने सदनिका वा जागा असली पाहिजे, ही अट काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षणासाठी, नोकरीसाठी अन्यत्र राहणाऱ्या वा भाडय़ाने सदनिका घेऊन राहणाऱ्या नागरिकांना त्यांच्या आधारकार्डवर ते सध्या राहात असलेला चालू पत्ता नोंदवता येईल.
यूआयडीएआयने दिलेली ही सेवा मुख्यत: नुकताच पत्ता बदललेल्या किंवा बदलणाऱ्या नागरिकांसाठी आहे. त्या अंतर्गत पत्ता प्रमाणीकरण पत्रासाठी सत्यापनकर्त्यांच्या (अॅड्रेस व्हेरिफायर) मदतीने ऑनलाइन विनंती यूआयडीएआयकडे करता येईल. पत्ता सत्यापनकर्ता हा कुटुंबातील सदस्य, मित्र वा नातेवाईक असू शकतो. ही सेवा वापरून आधारकार्डावरील पत्ता बदलू इच्छिणाऱ्या व्यक्तीला त्याचा पत्ता बदलण्यास परवानगी देऊ शकणार आहे. मात्र, त्यासाठी पत्ता बदलू इच्छिणारी व्यक्ती आणि जो आपला पत्ता संबंधित व्यक्तीला वापरण्यासाठी परवानगी देणार आहे, अशा दोघांचेही मोबाइल क्रमांक आधारकार्डाशी संलग्न असणे आवश्यक आहे.
पत्ता अद्ययावत कसा कराल?
* यूआयडीएआयच्या संकेतस्थळावर जाऊन ‘माय आधार’ सुविधेवर ‘अॅड्रेस व्हॅलिडेशन लेटर’ या पर्यायावर जा.
तेथे ‘रिक्वेस्ट फॉर अॅड्रेस व्हॅलिडेशन लेटर’ हा पर्याय दिसेल. या ठिकाणी वापरकर्त्यांने स्वत:चा बारा अंकी आधार क्रमांक द्यायचा आहे. त्यानंतर सेंड ओटीपी या पर्यायावर क्लिक केल्यानंतर सहा किंवा आठ अंकी ओटीपी क्रमांक आधारकार्डाशी संलग्न असणाऱ्या मोबाइल क्रमांकावर येईल. त्यानंतर ‘लॉगइन’ पर्यायावर जावे लागेल.
ज्या व्यक्तीचा पत्ता वापरकर्ता वापरू इच्छितो, त्या व्यक्तीचा आवश्यक तपशील आणि आधार क्रमांक त्यानंतर द्यावा लागेल.
* ज्याचा पत्ता वापरणार आहात, त्या व्यक्तीला त्याच्या आधारकार्डशी संलग्न असणाऱ्या मोबाइल क्रमांकावर पत्ता वापरण्यासाठी परवानगी मागणारा एक संदेश लिंकसह प्राप्त होईल.
परवानगी देणाऱ्या व्यक्तीने त्या लिंकवर गेल्यानंतर पुन्हा संबंधित व्यक्तीच्या मोबाइल क्रमांकावर सत्यापनासाठी ओटीपी येईल. हा ओटीपी दिल्यानंतर वापरकर्त्यांच्या मोबाइलवर सव्र्हिस रिक्वेस्ट क्रमांक येईल.
* या क्रमांकावर लॉग इन करून नवा पत्ता नोंदवावा लागेल. त्यानंतर पत्ता बदलण्यास परवानगी देणाऱ्या व्यक्तीच्या आधारकार्डावर असलेल्या पत्त्यावर अॅड्रेस व्हॅलिडेशन लेटर सांकेतिक क्रमांकासह येईल आणि वापरकर्त्यांने या सांकेतिक क्रमांकासह यूआयडीएआयच्या संकेतस्थळावर ‘प्रोसिड टु अपडेट अॅड्रेस’ केल्यानंतर पत्ता बदलला जाईल.