पिंपरी- चिंचवड : मंत्री अदिती तटकरे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या बाबत विधान केलं आहे. धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांची मालिका सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एक चौकशी करत आहेत. आरोप सिद्ध झाल्यास राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील. असं अदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. मंत्री अदिती तटकरे या पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. धनंजय मुंडे यांच्यावर २०० कोटींच्या बोगस ठरावांचा आरोप होत, यावर बोलत असताना अदिती तटकरे यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे.
रायगड पालकमंत्री पदावरून देखील अदिती तटकरे यांनी त्यांचे मत व्यक्त केलं. आमची महायुती असल्याने मतमतांतरे असू शकतात. यावर तिन्ही पक्षाचे नेते मार्ग काढतील. रायगड प्रमाणेच नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत तोडगा काढतील अशी आशा व्यक्त केली आहे. असे निर्णय घेण्यासाठी वेळ लागतो. या निर्णयामुळे जिल्ह्याचा विकास थांबणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असे देखील तटकरे यांनी म्हटलं आहे.
पुढे त्या म्हणाल्या, लाडकी बहीण योजनेतील निकषांमध्ये बदल केलेला नाही. ज्यावेळी ही योजना आणली तेव्हापासून ते निकष लावण्यात आलेले आहेत. ऑगस्ट महिन्यात देखील ७० ते ७५ हजार अर्ज अपात्र ठरवले होते. अचानकपणे लाभार्थ्यांची संख्या कमी जास्त केलेली नाही. आम्हाला काही तक्रारी आल्याने त्यात आम्ही तपासणी करत आहोत. ही योजना थांबणार नाही. विरोधक लाडकी बहिण योजनेबद्दल अपप्रचार करत आहेत. असा आरोप अदिती तटकरे यांनी विरोधकांवर केला आहे.