येरवडा येथील डॉ.चिमा उद्यान मध्ये उभारण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाची पाहणी आणि उदघाटन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. उपसभापती नीलम गोऱ्हे आणि शिवसेना नेते तसेच पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी आदित्य ठाकरे यांना विचारले की,केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे राज्यसभा खासदार नारायण राणे आणि भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या या दोन्ही नेत्याकडून शिवसेनेच्या नेत्यांवर दररोज आरोप होत आहेत. हे आरोप तर थेट मातोश्री पर्यंत येऊन पोहोचले आहेत. त्यावर ते म्हणाले की, “मला वाटत की त्याला किती महत्व द्यायचं, हे आपण ठरवायचे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.

आगामी महापालिका निवडणुक महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढणार की,शिवसेना पक्ष म्हणून त्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, जसजशा निवडणुका जवळ येतील, तसे आपले महत्वाचे नेते सांगितलंच. पण देशभरात शिवसेना प्रत्येक निवडणुक लढवित आहे. इतर राज्याचा विचार करायचा झाल्यास मणिपूर, उत्तर प्रदेशात आम्ही सर्व ठिकाणी आम्ही निवडणूक लढवित असल्याचे त्यांनी सांगितले.

मतदार नोंदणी संदर्भात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कशा प्रकारे नियोजन आहे. त्याबाबत ते म्हणाले की, “आपल्या प्रत्येक नागरिकाचा लोकतंत्र हा आवाज असतो. ते आपल शस्त्र असते, त्यामुळे मी माझ्या भाषणात म्हणालो की, मतदार नोंदणी केली पाहिजे. ज्या निवडणुका येतील, तो आपला आवाज बुलंद करणे गरजेचे आहे आणि हे मतदान असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.”

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya thackeray reaction on narayan rane and kirit somayya allegations svk 88 hrc