पुणे: अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराच उदघाटन उद्या २२ जानेवारी रोजी आहे.त्या पार्श्वभूमीवर देशभरात विविध कार्यक्रमाच आयोजन करण्यात येत आहे.त्याच दरम्यान आज ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांची पुण्यात जाहिर सभा झाली.त्यावेळी राज्य आणि केंद्र सरकाराच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दात त्यांनी टीका केली.त्या सभेनंतर आदित्य ठाकरे यांनी पत्रकाराशी संवाद देखील साधला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उद्या अयोध्येत राम मंदिराच उदघाटन होत आहे.तर तुम्ही दर्शनाला केव्हा जाणार त्या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले की,अयोध्येत प्रभू श्रीराम यांच्या मंदिराच उदघाटन होत आहे.त्या बद्दल मी खूप आनंदी असून उद्या आम्ही नाशिक येथील काळाराम मंदिरातील ‘प्रभू श्रीराम’ यांच दर्शन घेणार आहे.त्यानंतर गोदावरी नदीची आरती देखील करणार आहे. तर भगवान श्रीराम हे सर्वांचे असून आम्ही लवकरच अयोध्येत दर्शनाला जाणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya thackeray statement that he will visit shri ram mandir in ayodhya svk 88 amy